Ticker

CSAT शेवटचे 14 दिवस

CSAT शेवटचे 14 दिवस  


1) आता सध्या तुमचे 80 पैकी किती प्रश्न सोडवून होतात

-जर 60 पेक्षा कमी होत असतील तर 

ते जास्त का होत नाहीत याच्या कारणांची यादी करा.... आपण त्यावर solution काढू


2) passages 10 पैकी 10 सोडवून होतात का?

- नसतील होत तर ते 10 पैकी 10 सोडवाच कारण 2 गणिते सोडवण्याच्या वेळेत 1 passage होऊ शकतो


3) passages मध्ये accuracy येते का?

- जर नसेल येत तर

कोणत्या प्रकारच्या passages मध्ये जास्त चूका होतात त्यावर विचार करा... आणि या प्रकारातील सारखे चुकणारे प्रश्न (एक दोन प्रश्न) final exam ला उत्तर sure नसले तर skip करू शकता...


-passage वाचताना त्यातील सगळ्याच facts, सगळ्याच घटना लगेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे वाचनाचा flow तुटतो आणि मग आपण एकच line दोनतीन वेळा वाचतो.... मग गोंधळतो...So better आहे की No Stop passage वाचा


- accuracy साठी elimination method वापरा, जसे की

एकाच प्रश्नांमध्ये 3 किंवा 4 विधाने दिली असतात आणि खाली पर्यायात त्यांपैकी काही विचारलीत( फक्त अ,ब किंवा फक्त अ, क,ड किंवा फक्त ब, ड आदी)  तर दोन विधानांमध्ये contrast होणारी विधाने बघा आणि ती eliminate करून उत्तर काढा....

- उताऱ्यातील concept वर आधारित एखादे विधान common sense वर आधारित दिलेले असते पण ते उताऱ्यात नसते, पण आपल्याला ते योग्य वाटू शकते.... so उताऱ्यात

verify केल्याशिवाय mark करू नका.


- extreme keywords ला फोकस करा, अशी विधाने शक्यतो चुकीची असतात.

- तुम्हांला Science अवघड जातंय म्हणून science चा passage न वाचताच skip नका करू... त्यातील प्रश्न जरी वाचले तरी आपल्या GS च्या knowledge वर 2-3 प्रश्न सोडवू शकतो.


4) पेपर सोडवताना random switching करता का?


- जर करत असाल तर गोंधळ उडू शकतो, त्यामुळे चुका जास्त होतील, परिणामी attempt कमी होईल

तर हे टाळण्यासाठी एक-ते-एक करा

म्हणजे passages करायला घेतले तर ते पूर्ण करा...किंवा reasoning आणि aptitude  घेतले तर ते पूर्ण करा हे करताना एखादे येत नसेल तर skip करून पुढे जा....


5) Decision making ला 12.5 पैकी 12.5 येतात का?


- नसतील येत तर

आत्मपरीक्षण करा की का येत नाहीत... जी situation दिली आहे, त्यात तुम्ही कोण आहेत आणि सर्वात maximum जनकल्याण साधणारा option कोणता यावर काम करा.




6) एक passage सोडवून झाला की किंवा math चा एक प्रश्न सोडवून झाला की OMR sheet वर लगेच गोळे करतात का?


- जर करत असाल तर ते धोकादायक आहे

कारण जे करताना पेपर सोडवण्याचा आपला momentum बिघडू शकतो

यासाठी slot करा जसे की 50+25+5 किंवा 25+25+30 किंवा इतर पद्धतीने, पण slot जास्त प्रश्नांचे असावेत... 


7) math reasoning सोडवताना जर 7-8 ओळींची situation दिली असेल तर सुरुवातीपासून न वाचता... खाली प्रश्न काय विचारलाय ते आधी पहा म्हणजे वेळ कमी लागेल


8) बऱ्याच गणितांत option वरून उत्तर काढण्याचा प्रयत्न करा, प्रश्न लवकर सुटेल


आता शेवटचे 14 दिवस फक्त आयोगाचे पेपर सोडवा, ते सारखे सारखे बघा... त्या पेपर सोबत Familiar व्हा!!!!


सर्वांना खूप शुभेच्छा 💐💐



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या